डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश अँड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर, येथील शाळेमध्ये दरवर्षी पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळ्या खेळाचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. भारतीय संस्कृती प्रमाणे साजरे केले जाणारे सर्व सण या ठिकाणी साजरे केले जातात. शाळेमध्ये दरवर्षी पी टी ए म्हणजेच पेरेंट्स टीचर्स असोसिएशन स्थापित केली जाते. शाळा आणि विद्यार्थ्यांविषयीचे सर्व निर्णय घेताना पी टी ए च्या सर्व सभासदांच्या सल्ल्याचा विचार केला जातो.
वार्षिक स्नेहसंमेलन, सहल, शाळेचे शुल्क, शाळेची वेळ, शिस्त इत्यादी सर्व गोष्टी शाळेमध्ये फारच प्रभावीपणे राबवल्या जातात. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये भेदभाव होत नाही. सर्व विद्यार्थ्यांना सारखी वागणूक मिळते. प्रत्येक पालक हा आपली अडचण घेऊन मुख्याध्यापकांनी पर्यंत जाऊन आपले विचार मांडू शकतो.
पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावी पर्यंतचे सर्व वर्ग या ठिकाणी उपलब्ध असल्याकारणाने अचानक मध्येच शाळा बदलण्याची वेळ येत नाही. या शाळेचा शिक्षकवर्ग ही अतिशय उच्च दर्जाचे शिक्षित असा आहे त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांचेही सर्व विद्यार्थी आणि शाळेवरती पूर्ण लक्ष आहे. या शाळेमधील सर्व विद्यार्थी संस्कारीक आणि हुशार म्हणूनच बाहेर पडतात.

शिवदास झास्कर
शिवदास झास्कर

My experience with The DES School has been over the last few years, and it has been very satisfying as the school is very progressive and continuously growing. I am very happy to see my daughter evolve, grow, and blossom into the person she truly is. The way the school nurtures the children through performances and different activities has truly overwhelmed us.

Mr. Avinash Lashkare
Mr. Avinash Lashkare

माझे नाव श्री. विनोद सुभाष मुळे, माझी कन्या ईश्वरी विनोद मुळे ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल बाबुराव नगर शिरूर येथे ज्युनिअर केजी, सिनियर केजी व आता इयत्ता पहिली इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहे. माझ्या तीन वर्षाच्या अनुभवानुसार मला असे वाटते की, आपले डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शाळा ही मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे माध्यम असून येथे ज्युनिअर केजी पासून ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना नव-नवीन गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्याची संधी मिळतेच व स्वतःलाही सिद्ध करता येते. आपल्या शाळेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक, व नैतिक विकास होत आहे, त्याचबरोबर शाळा प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन इत्यादी राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करत असते. त्यातून विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळते. इतरही भारतीय सण जसे की गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा च्या निमित्ताने पाद्यपूजन असेल किंवा कन्या पूजन, रक्षाबंधन, दहीहंडी, आषाढी एकादशीची वारी असेल, दिवाळी, ख्रिसमस इत्यादी सर्व सण साजरे केले जातात. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कामाविषयी माहिती देऊन जबाबदारी दिली जाते. शाळा नियमितपणे पालकांशी संवाद साधण्यासाठी सभा घेते. वर्गांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गट करून त्यांच्यामध्ये संघ आणि नेतृत्व कौशल्य विकसित केले जाते. शिक्षक, विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्गासमोर बोलण्यासाठी आणि कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्यातील संभाषण कौशल्य आणि स्टेज डेरिंग इत्यादींमध्ये सुधारणा करून घेतात. शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये शाळेकडे प्रशस्त असे खेळाचे मैदान खो-खो कबड्डीचे मैदान आणि त्याचे साहित्य असून योग्य उपकरणासहित सुस्थितीत असलेली प्रयोगशाळा आणि कम्प्युटर लॅब ही आहे. एक भारताचा सुजाण नागरिक आणि शाळेचा एक पालक म्हणून मी शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

श्री. विनोद सुभाष मुळे
श्री. विनोद सुभाष मुळे

डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या शाळेत माझी दोन मुले शिकत आहेत. या शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, खेळ, कृतियुक्त उपक्रम , आंतरशालेय स्पर्धा  पुण्यतिथी, जयंती असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. प्रामाणिकपणा, शिस्त हे सर्व गुण विकसित होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते. वेळोवेळी पालकांसोबत सभा घेतल्या जातात. या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्येक मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतात. सर्व मुलांना बरोबरीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मुलाच्या कलागुणांना वाव दिला जातो. अभ्यासाबरोबरच संस्कारही आमच्या मुलांना या शाळेत मिळतात. गणपती स्तोत्र ,अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र ई. असे विविध प्रकारे मुलांवरती संस्कारही केले जातात.

सौ. स्वाती योगेश कर्डिले
सौ. स्वाती योगेश कर्डिले

नमस्कार मी स्वाती मयूर नरवडे, माझी मुलगी कुमारी कादंबरी मयूर नरवडे या शाळेमध्ये शिकते. शाळेचे इमारत अतिशय प्रशस्त आणि सुसज्ज आहे. शाळेतील सर्व शिक्षक मुलांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहेत. शाळेमध्ये मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक आणि सांस्कृतिक विकासाकडेही लक्ष दिले जाते. नृत्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि मुलांना त्यामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते. भारतीय सण व उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरी केले जातात. शाळेतील आवारात मुलांना अतिशय सुरक्षित असे वातावरण उपलब्ध करून दिलेले  आहे. मुलांच्या व पालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना ही केल्या जातात. शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना आम्हा पालकां तर्फे शुभेच्छा. 

सौ. स्वाती मयूर नरवडे
सौ. स्वाती मयूर नरवडे